पुन्हा एकदा गरजणार सह्याद्री
३५० वर्षानंतर प्रथमच पावनखिंडीत येणार भगवी लाट....
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान
आयोजित गडकोट मोहिम २०१७ ( वर्ष ३१ वे )
श्री पन्हाळागड ते श्री विशाळगड ( दि ११ जानेवारी ते १५ जानेवारी २०१७ )
_शाळेत असताना ऐकलेली ती गोष्ट आज प्रत्यक्ष अनुभवायला मिळणार...._
_ज्वलंत इतिहासाची साक्ष देणार्या ऐतिहासिक मार्गावर प्रत्यक्ष आपली पाऊले चालणार...._
_सिद्धी जौहरच्या हजारों यवणांच्या वेढ्यात छत्रपती शिवाजी महाराज अडकले होते त्यांना सोडवण्यासाठी दोन वाघ एक बाजीप्रभु देशपांडे आणि दुसरा शिवा काशिद आणि सोबतीला फक्त ३०० बांदल मावळे होते !_
काही करोनी राजे विशाळगडावर सुखरुप पोहचले पाहिजेत बस्स !_
_याच ध्येयाने हे मराठे वाघ यवणांवर तुटून पडले...._
_आज मरण आले तरी चालेल पण सह्याद्रीला कधीच कुनापुढे झुकू नाही देयचं !_
_लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे !_ _बस्स याच सळसळत्या रक्ताने बाजीप्रभू हजारपट ताकतीने घोडखिंड लढवत होते, अरे शेकडो यवणांना एकटा बाजी कापत होता... रानातील कणसं कापावी तसे बाजी यवणांना कापत सुटला... टाफ होत नव्हती कुनाची पढे येयची ! आणि आलेच कुनी पुढे तर त्यांची मस्तकं धडापासून वेगळी व्हायची !_
_कारण,_ _शंभर दिवस शेळी बनुन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ बनुन जगायचं हा छत्रपती शिवरायांचा मंत्र_ _सतत आठवन करुन देयचा,_
_बाजी हार मानायला तयार नव्हते, सिद्धी पुरता संतपला होता काही करोनी या वाघाचा खात्मा केलाच पाहिजे हाच विचार करत होता !_
_आणि सिद्धीला कल्पना सुचली त्याने त्याच्या सैनिकाला बंदूकीने गोळी मारायला सांगितले..._
_आणि सुसाट एक गोळी बाजींच्या छातीत घुसली, बाजी कोसळले..._
_खेळ सारा संपणार होता, हिंदवी स्वराज्य स्वप्न पुर्ण होण्याआधीच नष्ट होणार होते.... आणि अशातच बाजी ताडखन् उठले... मला तोफेंचा आवाज आला नाही, म्हणजे राजं अजुन विशाळगडावर पोहचले नाहीत !_
_आणि गरजले बाजी...._
_अरे सांगा त्या सिद्धीला... तोफेंचा आवाज माझ्या कानी येत नाही तोपर्यंत बाजी मरायला तयार नाही_ _आणि बाजी उठून पुन्हा लढू लागले !_
_हर हर महादेव ची गर्जना झाली..._
_बाजींची तलवार सपासफ् फिरू लागली..._
_इकडे स्वतः शिवाजी महाराजांच्या वेषात शिवा काशिद मृत्युच्या पालखीत बसुन विशाळगडाकडे रवाना झाले होते आणि मध्येच घात झाला शिवा काशिद पकडले गेले !_
_शिवाजी पकडले गेल्याची बातमी सिद्धीला मिळताच सिद्धी भलताच खुश झाला आणि तेवढ्यात त्याच्या एका सैनिकाने हा नकली शिवाजी असल्याचे बजावले आणि खवळला सिद्धी !_ _डाव क्षणांत संपला होता_
_शिवा काशिदांचा मृत्यु निश्चित होता पण मरताना शिवा काशिद म्हणाले...._ _शिवाजी बनुन जन्माला नाही आलो म्हणुन काय झाले मरताना शिवाजी बनुन मरतोय जीवन सार्थक झाले !_
_आणि शिवा काशिदांचा अंत झाला !_
_तोपर्यंत शिवाजी महाराज गडावर सुखरुप पोहचले होते आणि तोफेंचा आवाज झाला बाजींनी आवाज ऐकताच प्राण सोडले..._
_आणि शिवरायांना अश्रू अनावर झाले...._
_बाजीप्रभू देशपांडे आणि शिवा काशिद व त्यांच्या अगनित पराक्रमी मावळ्यांच्या बलिदानाने पावन झालेली पावनखिंड आज एक ऐतिहासिक साक्ष बनुन तुमच्या आमच्या सारख्या असंख्य मावळ्यांना हाक मारत आहे !_
_येणार ना मावळ्यांनो ?_
_आपल्या पुर्वजांच्या बलिदानाला उजाळा देयला..._
_त्यांच्या पावन स्मृतिस अभिवादन करायला...._
_पावनखिंडीच्या पवित्र भुमीला माथा टेकवायला..._
_छत्रपती शिवरायांचे आणि त्यांच्या मावळ्यांचे आशीर्वाद घेयला..._
_आणि ३५० वर्षानंतर पुन्हा एकदा पन्हाळगड ते विशाळगडावर भगवी लाट आणायला..._
मी तर जाणारच !
कारण, मला जाण आहे आपल्या ज्वलंत इतिहासाच्या पराक्रमाची !
मला आस आहे त्या गडकोटांची !
जगात कुनाच्या वाटेला आले नसेल असे बलिदान आपल्या मराठा मावळ्यांना लाभले हा माझ्यासाठी सर्वात मोठ्ठा अभिमान आहे
आणि गर्व आहे मला मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असल्याचा !
जय भवानी🚩जय शिवराय
राष्ट्रांत निर्मु अवघ्या शिवसुर्यजाळ
( श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड)
